IPL 2020 News : ‘आयपीएल’साठी केंद्र सरकारची औपचारिक परवानगी मिळाली –  ब्रिजेश पटेल 

Formal permission is given by the Central Government for the IPL- Brijesh Patel.

एमपीसी न्यूज – संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘आयपीएल’साठी केंद्र सरकारची औपचारिक परवानगी मिळाली आहे. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

या स्पर्धेसाठी बहुतेक संघ  20 ऑगस्टनंतर रवाना होतील. या सर्वांना युएईला जाण्या आगोदर  24 तासांच्या आत दोन आरटीपीसीआर चाचण्या कराव्या लागणार आहेत.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान शारजाह, दुबई आणि अबू धाबी येथील मैदानावर आयपीएलचा तेरावा हंगाम रंगणार आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने बीसीसीआयला तत्वत: मान्यता दिली. भारतात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ही स्पर्धा  युएईमध्ये आयोजित केली जात आहे. आम्हाला लेखी परवानगी मिळाली आहे, असे  ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.