Pimpri : माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे आज (गुरुवारी) पहाटे अल्पशा आजारने निधन झाले. त्यांचे वय 49 होते. 

त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2007 साली झालेल्या निवडणुकीत वाघ शिवसेनेकडून निवडून आले होते. चिंचवड, बिजलीनगर प्रभागाचे त्यांनी महापालिकेत नेतृत्व केले.  सामाजिक कामात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिजलीनजर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.