Dehuroad Crime News : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड पोलिसांच्या दोन कारवाया; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली आहे. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या कारवाया तळवडे येथे करण्यात आल्या.

गुटखा विक्रीच्या पहिल्या प्रकरणात प्रणब धनंजय मैती (वय 19, रा. कॅनबे चौक, तळवडे), दीपक बालाजी खांडरे (वय 26, रा. परंडवाल चौक, देहूगाव) आणि शुभमसिंह नरपतसिंग (वय 25, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत नारायण पवार यांनी शनिवारी (दि. 15) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून गुटका विक्री केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास कॅनबे चौक, तळवडे येथे छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार 435 रुपये किमतीचा गुटका जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहेत.

गुटखा विक्रीच्या दुसऱ्या प्रकरणात भवरलाल पुकाराम चौधरी (वय 30, रा. तळवडे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्रीमंत शेजाळ यांनी शनिवारी (दि. 15) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी हा तळवडे भागात गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तळवडे येथील एका भाड्याच्या खोलीतून चार हजार 994 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.