Fuel price hike : इंधन दरवाढ सुरूच ! सलग पाचव्या दिवशी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले

एमपीसी न्यूज : ट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मागील पाच दिवसांतील ही चौथी वाढ आहे. पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.