Govt Clarification: ‘मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच समायोजन; कोविडबाधित मृत्यूंबाबत सर्व माहिती पारदर्शक’

Govt Clarification: 'Adjustment as per CM's instructions; All information on covid deaths is transparent' मागील 1328 कोविड मृत्यूंची नोंद ही पारदर्शकताच असल्याचा शासनाचा दावा

एमपीसी न्यूज – कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. या माहितीत पारदर्शकता असावी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रारंभीपासून दिली असून त्यानुसारच हे समायोजन करण्यात आले आहे. शिवाय यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून या माहितीचे समायोजन नियमितपणे केले जाणार आहे. यापूर्वी देखील दुबार नावे वगळण्याची कार्यवाही झाली होती, असे स्पष्टीकरण राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईतील 862 आणि उर्वरित राज्यातील 466 अशा एकूण 1328 जुन्या कोरोना मृत्यूंची नोंद आज नोंद करण्यात आली. त्यावरून सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याबाबत शासनाच्या वतीने रात्री उशिरा हे स्पष्टीकरण करण्यात आले.

13 जून रोजीच सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात त्यांच्या त्यांच्या अखत्यारीतील प्रयोगशाळांकडून अद्ययावत माहिती घेण्यास व ती भरण्यास सांगितले होते, त्यानुसार फेरतपासणी करून समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येत आहे, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.