Maval : कंत्राटदाराला धनादेश देण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अन शिपाई एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – कंत्राटदाराने ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या कामाचा धनादेश देण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

ग्रामसेवक प्रल्हाद कचरु आबनावे (वय 36, रा. नवी सांगवी, पुणे), शिपाई दत्तात्रय गणपत लालगुडे (वय 32, रा. कुसगांव, ता. मावळ) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मावळ तालुक्यातील कुसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत काम केले. या कामाचा 1 लाख 70 हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक प्रल्हाद याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय याने स्वीकारली. दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून एसीबीने शिपायासह ग्रामसेवकाला 25 हजार रुपयांच्या लाचेसह अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.