Pimpri : रेल्वेच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी पिंपरी येथे घडली.

रवींद्र काशिनाथ भोवर (वय 60, रा. महावीर रेसिडन्सी, गजानन महाराज मंदीराजवळ, दिघी) असे रेल्वेच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

पोलीस हवालदार बाळासाहेब साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास लोणावळा पुणे लोकलखाली सापडून रवींद्र यांचा मृत्यू झाला. भोवर यांच्या खिशात एक फोन डायरी आणि ओळखपत्र सापडले. त्या आधारे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. पोलीस कर्मचारी तानाजी पाटील अपघाताबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.