Sangavi News : …म्हणून मी फेसशिल्ड लावले – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मागील शनिवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना झालेली शाईफेक आणि आज (शनिवारी) पुन्हा शहर दौऱ्यावर येत असताना शाईफेक करण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसशिल्ड घालून सांगवी येथील (Sangavi News) पवनाथडी जत्रेला भेट दिली. कोणाला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. त्यांना घाबरून मी फेसशिल्ड लावली नाही. तर, माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी फेसशिल्ड लावल्याचा खुलासा त्यांनी केला.

महापालिकेच्या वतीने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी  येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर 16  ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेला भेट देण्यासाठी पालकमंत्री पाटील आज (शनिवारी) शहरात आले आहेत.

Sangavi News : महिला स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या, असा धमकी वजा इशारा देण्यात आला होता. (Sangavi New) या धमकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरेशी खबरदारी घेतली.अतिरिक्त खबरदारी घेत ते पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी आले. सुरक्षिततेसाठी पालकमंत्री पाटील यांनी फेस मास्कचा वापर केला होता.

त्याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडला असले की फेसशिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही. एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो. पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.