Pune : सराफा व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून दरोड्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – मुंढवा येथील एका सराफा व्यापा-यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयन्त केला. यावेळी व्यापा-याने विरोध केला असता दरोडेखोरांनी व्यापा-यावर कोयत्याने वार केले. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज बुधवारी (दि.26) दुपारी दीडच्या सुमारास मुंढवा येथील हरिकृष्ण ज्वेलर्स येथे घडली.

मिलन सोनी (वय 35, रा.मुंढवा) असे जखमी व्यापा-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन सोनी यांचे केशवनगर मुंढवा येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास चार ते पाच जण तोंडाला रुमाल बांधून शिरले व कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील ऐवज लुटण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोनी यांनी हल्लेखोरांचा विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्या  अंगावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सोनी यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले.

घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना कळवताच मुंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. हल्ल्यात जखमी झालेल्या सोनी यांना खाजगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरून आरोपींना शोधण्याचे काम मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.