Pimpri : कष्टकरी कामगारांनी मुलांना चिकाटीने उच्चशिक्षित करावे- काशिनाथ नखाते

एमपीसी  न्यूज –  कष्टकरी कामगारांचे  जीवनात अनेक चढ – उतार असतात ,शिक्षण घेण्याच्या काळात आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामूळे कामगाराना शिक्षण घेणे  शक्य झाले नाही  मात्र कोणत्याही परिस्थितीत  आपल्या  मुलाना शिक्षण घेन्यापासून न रोखता त्याना उच्चशिक्षित करावे असे मत कष्टकरी  संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे आज असंघटित कामगार  मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले . यावेळी उपाध्यक्ष  राजेश माने, राजु बिराजदार, जिल्हा निमंत्रक बालाजी इंगळे, सुखदेव कांबळे, धर्मेंद्र पवार, ओम प्रकाश मोरया, दादा खताळ, महादेव गायकवाड, काविरा डोके, सीमा शिंदे, अर्चना मोटे, नाझिया शेख, योगिता शेडगे, उषा कोळेकर, मन्सूर पठाण, महरून शेख, देवीदास वाव्हुळे, इस्माइल सय्यद आदींसह शहरातील विविध ठिकाणचे कामगार मोठ्या संखेने आपल्या पाल्ल्यासह उपस्थित होते.

मेळाव्याची सुरुवात कष्टकरी गीत गाऊन करण्यात आले, यावेळी सुमारे २५० विद्यार्थ्यांना प्रसीद्ध नवनीत व्यक्तिमत्व विकास एकूण ९ पुस्तकांचा संचचे वाटप करण्यात आले.

यावेळी नखाते म्हणाले, शिक्षित आणि चांगले ठिकाणी नोकरीस असणारे कर्मचारी आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी अग्रेसर असतात तर एकिकडे सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना आपल्या शालेय जीवनात अनेकवेळा ईच्छा असताना अनेक अडचणींमुळे व आर्थिक स्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामूळे आवड नसणारे काम व क्षेत्र निवडावे लागते. शिक्षणामुळे आपले अधुरे स्वप्न मुलांच्या रुपात पूर्ण करु शकतो.  तसेच आजच्या स्पर्धेच्या  युगात त्याला सक्षम घडवण्यासाठी आपले कामातून वेळ काढून प्रयत्न करावेत व अशिक्षित रहाण्याचे अनेक परिणाम टाळावेत. प्रास्ताविक भास्कर कदम यांनी तर आभार वंदना थोरात यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.