Loni Kalbhor: तो कोरोनातून बरा झाला, नातेवाईकांनी आनंदाने डीजे लावला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला

He recovered from Corona, relatives happily hired a DJ and police filed a case in loni kalbhor या व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन केले नव्हते.

एमपीसी न्यूज- त्याला कोरोना झाला. तो त्यातून बरा होऊन घरी परतला. त्याच्या मित्र आणि नातेवाईकांना इतका आनंद झाला की त्यांनी डीजे आणून त्याच्यावर ठेका ठरला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की तो पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी आता 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी पुढाकार घेत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी या 16 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर गावातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. दहा दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एक जुलै रोजी त्याला डिस्चार्ज मिळाला.

ती व्यक्ती घरी परत आल्यानंतर त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी डीजेच्या तालावर ठेका धरत त्याचे स्वागत केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.

या व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन केले नव्हते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.