Pimpri Chinchwad RTO : पिंपरी-चिंचवड आरटीओ मार्फत वाहन चालकांसाठी आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक (Pimpri Chinchwad RTO) परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) आर्या ट्रान्स सोल्युशन्स प्रा. ली. कंपनी तर्फे ‘हिरोज ओंन द रोड’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत बस चालकांसाठी नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये 114 चालकांची आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, मोटार वाहन निरीक्षक विंदा गुरावे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमृत गोडसे, आकाश कांबळे, आर्या ट्रांस सलूशन प्रा. लि.चे संचालक अमित फरांदे, लोकमान्य हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Pune : माहिती अधिकार दिन 27 किंवा 29 सप्टेंबर रोजी साजरा करावा – प्रदीप नाईक यांची मागणी

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Pimpri Chinchwad RTO) मनोज ओतारी, सहायक मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे यांनी उपस्थित बस चालकांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन दिले. दहा उत्कृष्ठ बस चालकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिबिरात 114 बस चालकांची नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. बस चालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी आवश्यक असलेल्या बस चालकांना चष्मे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.