Maval News : शिवाजीराव असवले मित्र परिवारच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीराव असवले मित्र परिवारच्या वतीने टाकवे येथील भैरवनाथ मंदिरात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. तब्बल 180 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व गरजूंना धान्य वाटप व गरजू महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेस देखील वाटप करण्यात आले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व तालुका राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले मित्र परिवार व हिलिंग हॅन्डस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

180 नागरिकांनी सहभाग घेतला, त्यामध्ये पोटाचे विकार, मूळव्याध, भगिंदर, बद्धकोष्ठता, हर्निया, फिशर तसेच समतोल आहार, पोटाशी निगडित असणा-या इतर सर्व आजारावर व विकारावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरजुना साड्यांचे वाटप व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

आरोग्य शिबीरात 180 नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी कुलस्वामीनी महिला बचत गटाच्या तालुका अध्यक्षा सारीका सुनील शेळके,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, माजी तालुका अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष काळूराम मालपोटे माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बालगुडे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष नारायण ठाकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम,महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत,

युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास मालपोटे, प्रदेश सचिव विक्रम कदम, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, हभप रोहिदास महाराज धनवे, आंदर मावळ अध्यक्ष मारुती असवले,सरपंच भूषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, कान्हेचे सरपंच विजय सातकर, माजी सरपंच प्रकाश आगळमे, उपसरपंच जालिंदर गाडे, संतोष नरवडे, रामदास वाडेकर, नवनाथ पडवळ, बळीराम मराठे,

सोमनाथ पवळे, पांडुरंग कोयते, अनिल जाधव, स्वामी जगताप, अनिल असवले, अनिल मालपोटे, दिगंबर आगिवले, भगवान पवार, अविनाश असवले,  सोमनाथ असवले, दत्ता घोजगे, परशुराम मालपोटे, रघुनाथ मालपोटे, गणेश गाडे, गोरख मालपोटे, शेखर मालपोटे, विकास ना असवले, रमेश जाचक, गजानन खरमारे, सुरेश चोरघे,मनोज जैन, शांताराम साबळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्या, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.