Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डे’ निमित्त आयोजित मोहिमेला उत्सफूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – व्हॅलेनटाईन डे निमीत्त हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि तत्सम संघटना यांनी एकत्रीतपणे पुणे जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबवली होती. (Pune News) व्हॅलेनटाईन डे मुळे होणारे अपप्रकार टाळण्यासाठी  ही मोहीम राबविण्यात आली ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Chinchwad Bye-Election : निवडणूक जनतेनेच हातात घेतली – राहुल कलाटे

याला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये समाजातून अधिकाधिक जिज्ञासू सहभागी होत आहेत आणि जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या चळवळीत
1)‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे एकूण 75 हून अधिक ठिकाणी देण्यात आले.

2) विविध शाळांमधून आणि महाविद्यालयातून प्रबोधन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

3) प्रवचनाच्या  माध्यमातून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करून भारतीय संस्कृतीनुसार  आचरणाचे महत्व लक्षात घेऊन अशी कृती करण्याचे आश्वसन विद्यार्थी आणि जिज्ञासूंनी दिले.

4) संपूर्ण जिल्ह्यात फलक लेखनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

5) प्रबोधन चळवळीचे समाजातून होत असलेले कौतुक ‘सोनाई इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज’, या शाळेतील शिक्षकांनी तसेच आंबेगाव पठार शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि ‘राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ नर्सिंग’चे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी समितीच्या कार्याचे खूप कौतुक केले आणि गौरोवोद्गार काढले. येथून पुढे प्रतिवर्षी आमच्या शाळेत व्याख्यानाचे आयोजन करावे असेही सांगितले. (Pune News) ‘मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी’ येथेही सकारात्मक प्रतिसाद मिळाला तसेच हे मुलींचे कॉलेज असल्याने ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान घेण्याची मागणीही त्यांनी केली. असाच सकारात्मक प्रतिसाद ठिकठिकाणी मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.