Hinjawadi : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गांजा विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला अटक; 17 हजारांचा गांजा जप्त

Anti-drug squad arrests youth for selling cannabis; 17,000 cannabis seized

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा आणलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या तरुणांकडून 17 रुपयांचा गंगा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) रात्री बावधन येथे करण्यात आली.

कुणाल अनिल रजपूत (वय 29, रा. क्षत्रियनगर, बावधन, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक दिनकर परशुराम भुजबळ यांनी बुधवारी (दि. 24) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजपूत हा गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केले.

त्यांच्याकडून 17 हजार रुपये किंमतीच 850 ग्रॅम गांजा, रोख 300 रुपये आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.