Hinjawadi : हॉटेलमधील हाऊस किपींग कर्मचा-याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणा-या एका कर्मचा-याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. हा प्रकार रविवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथील बी फाईव्ह रेस्टोरंट येथे उघडकीस आला.

हॉटेलचे व्यवस्थापक राकेश शेट्टी (वय 35, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राम देब नाथ (वय 24, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज एक येथे बी फाईव्ह रेस्टोरंट हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फिर्यादी राकेश व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर, आरोपी राम हा हाऊस किपींगचे काम करतो. राम याने रविवारी रात्री हॉटेलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये मुलींचे व्हिडिओ काढण्याच्या उद्देशाने मोबाईल कॅमेरा सुरु करून ठेवला.

हा प्रकार हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आला. त्यानंतर, राम याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 511 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.