Hinjawadi : कंपनी कर्मचाऱ्यांनी केला दिड कोटींचा अपहार

एमपीसी न्यूज – कोणतेही अधिकार नसताना कंपनीतील बँक खात्यावरून 1 कोटी 64 लाख रुपयांचा कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी अपहार केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.6) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा अपहार 27 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 या एक महिन्याचा कालावधीत जेएचबीबी इंजिनिअरींग अँन्ड मॅकेनिकल प्रा.लि. कंपनीच्या दिल्लीतील एच.डी.एफ.सी बँक खात्याद्वारे करण्यात आला आहे.

याप्रकऱणी शुक्रवारी (दि.7) श्रीनिवास रघूनाथ देशिंगकर (वय 46 रा.पुणे) यांनी फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात राजेश आनंद भारद्वाज व महिला आरोपी (रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : मी नवनीत राणाच्या भूमिकेच स्वागत करतो – अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी कोणतेही अधिकार नसताना जे एच बीबी इंजिनिअरींग अँन्ड मॅकेनिकल प्रा.लि. कंपनीच्या दिल्ली येथील बँक खात्याद्वारे 27 फेब्रुवारी 2023 , 6 मार्च 2023 या कालावधीत 1 कोटी 64 लाख 98 हजार 33 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.