Pune : मी नवनीत राणाच्या भूमिकेच स्वागत करतो – अजित पवार

एमपीसी न्यूज : ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची आणि ठाकरे गटाचे (Pune) प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली जाईल, त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट असून मी त्यांचे स्वागत करतो.

आमचा हनुमान चालीसाला कोणाचाच विरोध नाही. एप्रिल महिन्यामध्ये महावीर जयंती, हनुमान जयंती, राम नवमी झाली. आता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तसेच, रमजानचा पवित्रा महिना सुरू असून सर्वांना शुभेच्छा आहेत. तसेच त्या कामातून त्यांना समाधान मिळत असेल, तर त्यांना समाधान मिळून द्यायला तयार आहोत असे सांगत खासदार नवनीत राणा यांना त्यांनी टोला लगावला.

आशिष देशमुखांच्या पक्ष प्रवेशबाबत माहिती नाही – अजित पवार

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार आशिष देशमुख राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा (Pune) चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार असे चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की,आशिष देशमुख यांच्याबाबत मला काही माहिती नाही.

त्या संदर्भात कोणासोबत देखील बोलण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील राजकारणात आल्यापासून कोण कुठ जाणार याबाबतची लिस्ट काढल्यावर तुम्हालाच त्याची संख्या समजणार नाही.अशा शब्दात भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांनी टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.