Hinjawadi crime News : मालमत्तेच्या वादातून माय-लेकीला मारहाण; आईच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम

एमपीसी न्यूज – मालमत्तेच्या वादातून कामावर जात असलेल्या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिच्या आईला देखील मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी सव्वा नऊ वाजता सुसगाव येथे घडली.

अजित कोळेकर, राजश्री अजित कोळेकर, नेहा कोळेकर, शांताबाई सूर्यवंशी (सर्व रा. सुसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 38 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यामध्ये मागील अनके दिवसांपासून मालमत्तेच्या कारणावरून वाद सुरु आहे. बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता फिर्यादी कामाला जात होत्या.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केली. अजित याने दगडाने मारून फिर्यादी यांना जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादीच्या आईला डोक्यात मारहाण केली. यामुळे आईची ऐकण्याची क्षमता कमी झाली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.