Hinjawadi crime News : हिंजवडीतून टेम्पो, तळेगावातून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाखांचा टेम्पो चोरून नेला आहे. तर तळेगाव दाभाडे परिसरातून दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आखेदान रानीदान चारण (वय 49, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चारण यांच्याकडे महिंद्रा पिकअप टेम्पो (एमएच 12 / एलटी 6744) आहे. चारण यांनी त्यांचा टेम्पो 20 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता बावधन येथील रतन ग्लास डेपो समोर पार्क केला होता.

रात्री अज्ञात चोरट्यांनी चारण यांचा तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो चारून नेला. हा प्रकार त्याच दिवशी साडेअकरा वाजता उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

विशाल दत्तात्रय टोपे (वय 26, रा. वाकी, बु. ता. खेड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोपे यांनी त्यांची 52 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 / एचव्ही 8631) सोमाटणे गावठाण येथे सुर्यकांत गायकवाड यांच्या घरासमोर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.