Hinjawadi Crime News : रस्त्यात अडवून तरुणीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

एमपीसी न्यूज – भर रस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन करून शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता, चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दत्तवाडी-नेरे चौकात 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

नितीन खंडू शेळके (वय 35, रा. चांदखेड, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 4) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडिल काम संपवून रिक्षाने घरी जात असताना आरोपी हा दुसऱ्या रिक्षातून पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांच्या रिक्षाला त्याची रिक्षा आडवी लावली. फिर्यादीला त्यांच्या रिक्षातून खाली उतरवले. ‘तू माझ्या संगे चल मी तुझ्याबरोबर लग्न केले आहे’, असे म्हणून आरोपीने भर रस्त्यात फिर्यादी सोबत गैरवर्तन केले.

त्याबाबत फिर्यादीच्या वडिलांनी त्याला जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीच्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन व चेहऱ्यावरती अ‍ॅसिड फेकीन, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेला. आरोपीने फिर्यादी सोबत भररस्त्यात गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.