Hinjawadi : कारची काच फोडून डायमंड आणि सोन्याच्या अंगठ्या पळवल्या

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्थ केलेल्या कारची काच फोडून कारमधून दोन डायमंड आणि सोन्याच्या अंगठ्या तसेच महागडे घड्याळ अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी पावणे आठ ते साडेनऊ या कालावधीत वडापाव कॅफेसमोर बावधन येथे घडली.

प्रिया सुनील नेवघी (वय 29, रा. एनडीए पाषाण रोड, बावधन) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रिया यांनी त्यांची एम एच 12 / एफ पी 5767 ही कार रविवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बावधन येथील वडापाव कॅफेसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ड्रायव्हर बाजूची पाठीमागील काच फोडली. कारमधून दोन डायमंड, सोन्याच्या अंगठ्या, एक रॅडो घड्याळ, ब्रँडची बॅग असा एकूण 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.