Hinjawadi : वाकड, हिंजवडी, दिघीमध्ये वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन तर, वाकड आणि दिघी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 20) दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सव्वा लाखाची सहा दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत.

पहिल्या घटनेत अशोक बाबूराव शेळके (वय 26, रा. चंदननगर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेळके यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ एम 2359 ही दुचाकी आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोर थेरगाव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 15 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घडली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत सत्येंद्र गिरीधारीलाल वर्मा (वय 31, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 12 / एच एच 7906 ही दुचाकी बावधन येथील शरद दगडे यांच्या इमारतीमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

तिस-या घटनेत रवींद्र कांतीलाल मगर (वय 30, रा. महाळुंगे, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगर यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 12 / एन एस 6820 आणि त्यांच्या मित्राची 30 हजार रुपये किमतीची एम एच 26 / ए एच 4001 या दोन दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेल्या आहेत. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे.

चौथ्या घटनेत ज्ञानेश्वर नथू तोंडे (वय 39, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोंडे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 12 / डी सी 0014 ही दुचाकी चांदणी चौक, बावधन येथील बंद पेट्रोल पंपाजवळ 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सव्वासहा वाजता उघडकीस आला. वरील तिन गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

पाचव्या घटनेत हर्षल आनंद दौंडकर (वय 32, रा. आळंदी, ता. खेड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दौंडकर यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 12 / एम सी 3957 ही दुचाकी आळंदी विश्रामगृहाशेजारी 25 जानेवारी रोजी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.