Hinjawadi: पाण्याचा टॅंकर भरण्यास मनाई केल्याने चौघांना मारहाण

Hinjawadi: Four beaten up for refusing to fill water tanker शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपी अमोल सुसगाव येथील एका विहिरीवर पाण्याचा टॅंकर भरत होता.

एमपीसी न्यूज– पाण्याचा टॅंकर भरण्यास मनाई केल्याने पाच जणांनी मिळून चौघांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.12) सकाळी सुसगाव येथे घडली.

प्रमोद तुकाराम चांदेरे (वय 28, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुदाम श्रीपती चांदेरे, अमोल काशिनाथ चांदेरे, योगेश भीमा चांदेरे, तुषार भीमा चांदेरे, गणेश सुदाम चांदेरे (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपी अमोल सुसगाव येथील एका विहिरीवर पाण्याचा टॅंकर भरत होता.

टॅंकर भरण्यास फिर्यादी यांनी मनाई केली. त्यावरून आरोपी सुदाम याने फिर्यादी यांच्या दोन भावांना कु-हाडीने मारहाण केली. यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले.

त्यानंतर अन्य आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्यांच्या चुलतीला हाताने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.