Pune: कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदतीसाठी सरसावलेले हजारो हात ‘कोरोना योद्धा’च- चंद्रकांत पाटील

pune: the citizen who financially helps in corona war they also corona warriors say chandrakant patil राज्य सरकारने लोककलावंत आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ व कलाकार यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा व त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या लढ्यात विविध प्रकारे नागरिक मदत करत आहेत. या लढ्यात आर्थिक मदत करणारे हे एक प्रकारे कोरोना योद्धाच असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रभाग १३ मधील गिरीजाशंकर विहार सोसायटीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांना पंतप्रधान निधीसाठी २५ हजार रुपये, तर महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री निधीसाठी २५ हजार रुपये मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारने लोककलावंत आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ व कलाकार यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा व त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘शांताबाई’ या गाण्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले कलावंत संजय लोंढे यांना क्रिएटिव्ह फौंडेशनच्यावतीने सारंगशेठ राडकर व संदीप खर्डेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते किराणा व अन्य मदत दिली.

माझ्यासारख्या अनेक कलावंतांची परवड होत असून मी गणेशोत्सवासाठी काही गाणी शब्दबद्ध केली होती. मात्र, आता सर्व उत्सव रद्दबातल झाले आहेत. लॉकडॉउनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत संदीप खर्डेकर, सारंग राडकर व क्रिएटिव्ह फौंडेशनने केलेली मदत अमूल्य असल्याचेही संजय लोंढे म्हणाले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सारंग राडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

अनेक नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्यामुळेच कोरोना विरुद्धची लढाई आपण लवकरच जिंकू, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

गिरीजाशंकर विहार सोसायटीचे संजय कबाडे (अध्यक्ष), रवींद्र गोखले (सचिव), आनंद शेलार (खजीनदार), काशीनाथ पटवेकर, अरुण दिघे, (व्यवस्थापन समिती सदस्य) यांनी हे धनादेश सुपूर्द करताना आम्ही समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण करत आहोत, अशी भावना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.