Hinjawadi : मोटारीतील चौघांकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिला प्रवास करीत असलेल्या मोटारीला आडवी मोटार घालत चार जणांनी भांडण करीत महिलेचा विनयभंग केला. ही घटना वाकड येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मुंबई येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटार क्रमांक एम एच 12/एनजे 8272 मधील चार अनोळखी व्यक्‍तींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या भावासोबत कारमधून जात होत्या. त्यांच्यामागून आरोपी कारमधून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या कारला कार वाकड ब्रिजखाली हिंजवडी येथे आडवी लावली. कारमधून आलेल्या चार जणांनी फिर्यादी यांच्या भावाला मारहाण केली. फिर्यादी या भावाला सोडविण्यास गेल्या असता आरोपींनी त्यांचा विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार याबाबत तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.