Chikhali : होणा-या नवऱ्याला मारहाण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या तरुणाने तरुणीच्या होणा-या नव-याला मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 13) मोरेवस्ती चिखली येथे घडली.

याप्रकणी 20 वर्षीय पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दादा मोहन पिसाळ (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिसाळ सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी तरुणीच्या घरी गेला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन झाल्यानंतर त्याने तरुणीचा हात पकडून ‘तू मला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर आरोपीने तरुणीला ‘ही बाब कोणाला सांगितल्यास होणा-या नव-याला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून घाबरलेल्या तरुणीने चिखली पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.