Hinjawadi News : सहा सदनिकांचे पाण्याचे कनेक्शन कापल्याने सोसायटीच्या पदाधिका-यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सोसायटीमधील सहा फ्लॅटचे पाण्याचे कनेक्शन कापल्याने सोसायटी सचिव, चेअरमन आणि कोषाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2021 पूर्वी माण रस्ता, हिंजवडी फेज एक येथे घडला.

प्रगती मनोज देसाई (वय 42, रा. माण रस्ता, हिंजवडी फेज एक) यांनी याप्रकरणी 27 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्क्रम उत्कर्ष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या सचिव बबिता दुबे, चेअरमन जीवन मुंढे, कोषाध्यक्ष तुषार चव्हाण (सर्व रा. स्क्रम उत्कर्ष सोसायटी, माण रस्ता, हिंजवडी फेज एक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रम उत्कर्ष सोसायटीमध्ये फिर्यादी यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटसह अन्य पाच फ्लॅटचे पाण्याचे कनेक्शन अज्ञातांनी कापले. त्यामुळे संबंधित फ्लॅटमध्ये राहणा-या नागरिकांना नाहक त्रास झाला. त्यांना पाणीमिळाले नाही. आरोपींच्या सांगण्यावरून कुणीतरी हे कनेक्शन कट केल्याचा फिर्यादी यांचा संशय आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.