Pune news : मुंबई-बेंगलोर महामार्गावरील सेफ्टी क्रॅश बॅरिअर चोरण्याचा प्रयत्न; एकास अटक

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्गावर अपघात टाळण्यासाठी लावलेले सेफ्टी क्रॅश  बॅरिअर एका चोरट्याने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी (दि. 27) दुपारी सुतारवाडी, पुणे येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राकेश पंढरीनाथ शिरसाट (वय 50, रा. वाकड ब्रिजखाली, वाकड. मूळ रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ संजय अमोलिक (वय 22, रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगलोर महामार्गावर रस्ता बनवणा-या कंपनीने अपघात होऊ नये यासाठी सेफ्टी कॅश बॅरिअर बसवले आहेत. आरोपी हा फिरस्ती असून तो वाकड ब्रिजखाली राहत आहे. त्याने सेफ्टी क्रॅश   बॅरिअर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.