Hinjawadi : टीसीएस कंपनीत कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज तीन येथील टीसीएस कंपनीत काम करणा-या एका कर्मचा-याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 3) सकाळी कंपनीत सहाव्या मजल्यावर उघडकीस आली आहे.

कपिल गणपत विटकर (वय 39, रा. वडाची वाडी, उंड्री, पुणे. मूळ रा. मिठानगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या कर्मचा-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल हिंजवडी फेज तीन येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीत असोसिएट म्हणून काम करत होते. मागील काही दिवसांपूर्वी घरात त्यांचा अपघात झाला. त्यावेळी ते काही दिवस सुट्टीवर होते. त्यानंतर त्यांना पाठीचे दुखणे सुरु झाले. त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी सहाव्या मजल्यावर जिन्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

प्लास्टिक टॅगच्या साहाय्याने गळफास घेतल्याची चर्चा सुरु असून हे प्लास्टिक टॅग विमानात सामान बांधण्यासाठी वापरले जातात. कपिल यांच्या आत्महत्येचा व्हिडिओ कंपनीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.