Hinjawadi News : गुटखा विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी गुटखा विक्रीसाठी निघालेल्या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी आणि गुटखा असा एकूण 71 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 24) सकाळी सव्वानऊ वाजता नेरे दत्तवाडी चौक येथे करण्यात आली.

श्याम मनोल सिंग (वय 20, रा. नेरे दत्तवाडी साने वस्ती, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गोविंद चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमित जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम सिंग हा गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता त्याच्या दुचाकीवरून (एम एच 12 / एफ एक्स 4194) गुटखा विक्रीसाठी जात होता. नेरे दत्तवाडी चौकातील एका चहाच्या दुकानाशेजारी पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. दुचाकी आणि गुटखा असा एकूण 71 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव यलमार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.