Hinjewadi News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 3) मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास पुनावळे येथे पवना नदीच्या ब्रिजवर घडली.

स्वप्नील (पूर्ण नाव माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी संकेत चंद्रकांत ससार (वय 22, रा. चांदे, लवळे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / एच एन 8115) पुनावळे येथील पवना नदीच्या पुलावरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने स्वप्नीलच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्नीलच्या डोक्यावर, कपाळावर, डोळ्याला, नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.