Hinjwadi: औषध दुकानातील सहका-याकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – औषधांच्या दुकानात एकत्र काम करणा-याने सहका-याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडीत घडली.

याप्रकरणी सचिन छाजेड (वय 45 रा.कोंढवा, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 24 वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी आणि आरोपी सचिन हिंजवडीतील एका औषधाच्या दुकानात कामाला होते.  सचिन हा सतत कामाच्या बहाण्याने फिर्यादीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.