Hockey News: कुरूक्षेत्र विद्यापीठने पारूल विद्यापीठविरूध्द केले तब्बल १६ गोल

एमपीसी न्यूज: संभलपूर विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत गत उपविजेत्या बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाचा पराभव करून एसएनबीपी २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसरीकडे कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी पारूल विद्यापीठविरूध्द तब्बल १६ गोल केले.

असोसिएशन ऑफ इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या मान्यतेने व मुख्य प्रायोजक असलेल्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्यावतीने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत संभलपूर विद्यापीठ, गुरू नानक देव विद्यापीठ, कुरूक्षेत्र विद्यापीठ व व्हिबीएसपी विद्यापीठ जौनपूर संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

संभलपूर विद्यापीठ संघाने गत उपविजेत्या बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाचा ३-२ गोलने पराभूव केला. त्यांच्या शक्ती कुंजूरने ९ व्या मिनिटाला पहिला गोल करून आपल्या संघाला आघाडी दिली. त्यांनतर त्यांच्या नितेशने लगेच १२ व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल केला. ३१ व्या मिनिटाला बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाच्या भरथ एमएच मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपल्या संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर ३९ व्या मिनिटाला बेंगलोर सिटी संघाच्या प्रणाम गौडाला डी मध्ये मिळालेल्या पासचा त्यांने चेंडूला योग्य दिशा देत संघाचा दुसरा गोल करून बरोबरी साधली. त्या नंतर दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीने एकमेकांविरूध्द गोल करण्याचे प्रयत्न केला. पण त्यांना यश येत नव्हते. ५७ व्या मिनिटाला संभलपूर संघाच्या आघाडीच्या फळीने रचलेल्या एका अफलातून चालीने बेंगलोर सिटी संघाच्या बचाव फळीला भेदले आणि संभलपूरच्या बिकाश लाक्राने कोणतीही चूक न करता चेंडू बंगलोर सिटीच्या गोल मध्ये टाकला.

ब गटाच्या दुसऱ्या लढतीत कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदशन करून पारूल विद्यापीठ, वडोदरा संघाचा १६- ३ गोलने धुव्वा उडविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.