Pune News : शिवजयंती निमित्त २०० कोविड योध्यांचा सन्मान

0

एमपीसी न्यूज : भोर येथील बारे खुर्द मधील जय मल्हार तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त कोरोनाच्या काळात देवदूत बनून आले डॉक्टर, मेडिकल कर्मचारी, शिक्षक व आरोग्य सेवक आदी २०० कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला.

कोविड योध्यांसोबतच भोर परिसरातील गावामधील सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशाताई, शिपाई, ग्राम दुत, आदींचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते हर्षदा धुमाळ यांचे व्याख्यान व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाची दीप प्रज्वलन सरपंच महेश खुटवड व अध्यक्ष लक्ष्मण बदक यांच्या हस्ते करण्यात आले.  तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माऊली बदक यांनी केले .

_MPC_DIR_MPU_II

यावेळी डॉक्टर राजेंद्र आगटे,  डॉ. भोर, डॉ.अमित शाह,  डॉ. राजेंद्र धिवार, दृव प्रतिष्टान अध्यक्ष राजू केळकर, सुरेश बदक सुरेश कडू, राजू धुमाळ, मनोज धुमाळ, हेमंत बोडके,  वसंत साळुंके, देशमाने सर, खुटवड , विठ्ठल दानवले , कुंदन झंजले, प्राची राजेशिर्के, प्रमिला वीर, सुनीता बदक, बिनिता एरंडे, सर्जेराव बोडके, उमेश बोडके, विठ्ठल झंजले, अनुराधा कुंभारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.