Hinjawadi News : पत्नीच्या मित्राकडून पतीस बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पत्नीच्या मित्राने आणि त्याच्या लहान भावाने मिळून पतीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी भुमकर चौकाजवळील केमसेवस्ती येथे घडली.

प्रथमेश पमेश सोनवणे (वय 21, रा. सम्राट चौक, वाकड) असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश कसबे उर्फ नन्या आणि त्याचा लहान भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रथमेश हे भुमकर चौकाजवळील केमसे वस्ती येथे आले. त्यावेळी एका कॉलनीमध्ये त्यांना त्यांची पत्नी दिसली. प्रथमेश यांनी पत्नीला ‘तू इथे काय करती’, असे विचारले. त्यावर तिने ‘मी माझा मित्र अविनाश कसबे याच्यासोबत इथे राहत आहे’, असे सांगितले. तेवढ्यात आरोपी अविनाश आला. त्याने प्रथमेश यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपी अविनाशचा लहान भाऊ आला. त्याने प्रथमेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.