Dehuroad Crime News : बेकायदेशीर आणि धोकादायकरित्या सिलेंडरमधून गॅसची चोरी; दुकानदाराला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर आणि धोकादायकपणे घरगुती वापराच्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरी करताना पोलिसांनी एका दुकानदाराला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) सायंकाळी देहूरोड येथे करण्यात आली.

सागर उर्फ अनिल रामचंद्र खरात (वय 21, रा. विकासनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास आदर्शनगर बस स्टॉप जवळ देहूरोड येथे आरोपी घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस काढून तो लहान सिलेंडरमध्ये भरत असताना मिळून आला. तसेच त्याने कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी घेतली नसल्याचे तपासात समोर आले. आरोपीच्या ताब्यातून गॅस सिलेंडर, रोख रक्कम आणि रिफिलिंगचे साहित्य असा एकूण 14 हजार 925 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.