Shivtejnagar News :श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भजन स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या महिला भजन स्पर्धेला भजनी मंडळ, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ आज (गुरुवारी) शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात महिला भजनी स्पर्धेचे आयोजन केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके, सुनील कदम, कार्याध्यक्ष दीपक पाटील, कमलिनी जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भजन स्पर्धेला सुरुवात झाली.

सकाळी 10 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात झाली. 2 हजार, 1 हजार 500 आणि 1 हजार अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणा-या मंडळाला बक्षीसे दिली जाणार आहेत. तर, सात उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे.

ज्ञानाई भजनी मंडळ, पूर्णानगर, राम कृष्ण हरी भजनी मंडळ घरकुल, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, शिवतेजनगर, श्री साई अबोली भजनी मंडळ, संभाजीनगर, कृष्णाई भजनी मंडळ, संभाजीनगर, सिद्धिविनायक भजनी मंडळ संभाजीनगर, शिवशक्ती भजनी मंडळ, संत तुकारामनगर, मुक्ताई भजनी मंडळ शाहूनगर, संत सीमा भजनी मंडळ, संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ घरकुल, शिव पार्वती भजनी मंडळ या मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम निर्णय परीक्षकांचा असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.