Pune News : डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्व अधिक – रिझवान शेख

एमपीसी न्यूज – सध्याच्या  डिजिटल युगात  डिजिटल (Pune News) तंत्रज्ञानाचा व्यापक वापर लक्षात  घेता सायबर सुरक्षेचे महत्व आणखी वाढले आहेअसे मत रिझवान शेख यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला  संस्थेतील  सर्व  प्राध्यापक व अधिकारी वर्ग एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने   उपस्थित  होते.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)  यांच्यावतीने  आयोजित  कार्यशाळेत  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन  करताना ते बोलत  होते. या क्षेत्रातील  एथिकल  हॅकिंग सारख्या  करिअरच्या संधी बद्दल त्यांनी सविस्तर  माहिती  विद्यार्थ्यांना  दिली. आपला  संगणक  व मोबाईल  हॅक  होऊ नये म्हणून  कशाप्रकारे  दक्षता  बाळगावी याबाबतही त्यांनी  विविध उदाहरणे सांगत मार्गदर्शन केले. व्हायरस,  ट्रोजन, किब्लॉगर,स्पायवेअर,रॅन्समवेअर व  मालवेअर या सह  सायबर  कायद्यांबाबतही  रिझवान शेख यांनी सविस्तर     मार्गदर्शन  केले.

Wakad News : वाहतूक कोंडीबाबत नागरिक, पोलीस लोकप्रतिनिधींची बैठक

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे  यांनी  केले. पाहुण्यांचा  परिचय अभिषेक बिजू या विद्यार्थ्याने  करून दिला. (Pune News) तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत वाडकर यांनी केले.यावेळी उपस्थित असलेल्या प्रिस्टिन इन्फोसोल्युशन प्रा.लि. च्या सदस्यांचेही आयआयएमएसच्यावतीने स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.