Maharashtra Petrol- Diesel : महाराष्ट्र शासनानेही कमी केले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या किंमती!

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील (Maharashtra Petrol- Diesel) दर कमी केल्यावर सर्वांचे लक्ष महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर लागले होते. आता प्रतीक्षा संपवून महाराष्ट्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल 2 रुपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.  

केंद्र सरकारने शनिवारी अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता पेट्रोल 9.5 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचबरोबर डिझेलही 7 रुपयांनी स्वस्त झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व राज्य सरकारांना व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार केरळने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. त्यानंतर महाराष्ट्राने आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात केल्या.

काय आहेत किंमती? 

राज्य शासनाने व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार असून, डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैशांनी उपलब्ध होणार आहे.

Petrol Diesel : सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एवढी घट; तर महिलांना देखील आनंदाची बातमी

यावर नेते शरद पवार म्हणाले, की ”केंद्र सरकारने दर कमी केल्याने महाराष्ट्रावर दबाव वाढला होता. दरम्यान केरळने देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील किंमती कमी केल्या आहेत.” बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राला राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Maharashtra Petrol- Diesel) घट करून दिलासा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.