Pune News : पुण्यात प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या, वाचा कुठे घडली घटना ? 

एमपीसी न्यूज : आदिवासी समाजातील एका जोडप्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. भोर तालुक्यातील निधान सांगवी येथे ही घटना घडली. सुनील गणपत जाधव (वय 28) व सुषमा मारुती मुकणे अशी आत्महत्या केलेल्या जोडप्यांची नावे आहेत. राजगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जाधव हा विवाहित होता. पहिल्या पत्नीपासून त्याला तीन लहान मुले आहेत. त्याचे नातेवाईक असलेल्या सुषमा हिच्याबरोबर देखील प्रेम संबंध होते. दरम्यान मागील तीन जानेवारीपासून हे दोघेही सुनील याच्या निधान सांगवी येथील घरात एकत्र राहत होते. दरम्यान मंगळवारी दोघेही घरांमध्ये मृतावस्थेत सापडले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.