Chikhali : चिखलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज –  चिखली (Chikhali) येथील पाटीलनगर मधील बगवस्ती या ठिकाणच्या विस्टेरिया सोसायटी व आजूबाजूच्या सोसायट्यांना मागील एक वर्षापासून कमी पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता याची कोणीही दखल घेत नसल्याची तक्रार रहिवाश्यांनी केली आहे.

Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे रोटरी फेस्टचे आयोजन

गेले दहा दिवसापासून तर या भागात अतिशय कमी पाणीपुरवठा होत आहे. 500  सदनिका असलेल्या सोसायटीस फक्त 4 ते 5 हजार लिटर पाणी ते पण एक दिवसाआड मिळत आहे.

चिखली मधील इतर भागात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो असे बागवस्तीच्या लोकांचे म्हणणे आहे. परंतु फक्त बगवस्ती मधील काही सोसायट्यांनाच खूप कमी प्रमाणत पाणी सोडले जाते. मागील चार वर्षात या सोसायट्यांनी विकत पाणी घेण्यासाठी जवळजवळ 25 कोटी रुपये खर्च केले आहेत.

सोसायटीच्या अगदी समोरच आता नवीनच कार्यान्वित झालेला चिखली (Chikhali) जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या भागातील सोसायट्याना रोज 15 टँकर पाणी विकत घ्यावे लागते यामुळे रहिवाश्यांची नाराजी आहे.

पुढील 8 दिवसात जर या भागतील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर या भागात असणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहराला पाणी जाऊ दिले जाणार नाही व  आंदोलन करून ते बंद केले जाईल अशी प्रतिक्रिया या भागातील लोकांनी घेतली आहे. तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या अकार्यक्षम प्रशासनाच्या विरुद्ध रस्ता रोको करून चिखली- देहूरोड अडवला जाईल असे हि सोसायटीचे लोक बोलत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.