Maval Crime News : दिवट गावच्या माजी उपसरपंचासह दोघांना अटक; तीन जिवंत कडतुसांसह पिस्टल जप्त

एमपीसी न्यूज – विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी मावळ तालुक्यातील दिवट गावच्या माजी उपसरपंचासह दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमाटणे गाव बैलजोडी कमानीसमोर, रामचंद्र मंगल कार्यालयाशेजारी, शिरगाव रोड येथे करण्यात आली.

मारुती बाळू लोखरे (वय 43, रा. दिवट, ता. मावळ, जि. पुणे) असे दिवट गावच्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. त्याच्यासह अतुल प्रकाश देशमुख (वय 26, रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे) याला देखील अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना माहिती मिळाली की, एक इसम सोमाटणे गाव बैलजोडी कमानीसमोर, रामचंद्र मंगल कार्यालयाशेजारी, शिरगाव रोड येथे बसलेला आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अतुल देशमुख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत देशमुख याच्याकडे पिस्टल बाबत चौकशी केली.

त्यामध्ये जप्त केलेले पिस्टल मारुती लोखरे याने त्याच्याकडे ठेवण्यास दिले असल्याचे देशमुख याने सांगितले. लोखरे याला पोलिसांनी सोमाटणे फाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी याप्रकरणी40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त दाखल केला. लोखरे हा मावळ तालुक्यातील दिवट गावचा माजी उपसरपंच आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार निशांत काळे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.