Pune: उरुळी देवाची परिसरात साथीच्या आजारांचा वाढता प्रभाव

Increase in spread of contagious diseases in Uruli Devachi area.

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरात कोरोणाची साथ सर्वाधिक आहे. परंतु, उरुळी देवाची आणि आसपासच्या गावांमध्ये कोरोणा बरोबर इतर साथीच्या आजाराने नागरिक त्रस्थ झाले आहेत.

उरुळी देवाची परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया यासारखे साथीचे आजार वाढले आहेत. मात्र, महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच आणि भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहूले यांनी केला आहे.

त्याच बरोबर याकडे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उरुळी देवाची या गावात बऱ्याच वर्षापासून कचरा डेपो होता, यामुळे गावातील सर्व विहिरी दूषित आहेत शिवाय विशेष करून पावसाळ्यात या दूषित पाण्याने साथीचे आजार वाढतात.

सद्या कोरोनाची साथ शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे ती उरुळीत ही आहे. पण, त्याबरोबर पाण्यामुळे आणि येथील प्रदूषित हवेमुळे मच्छर वाढण्याचे प्रमाण खूप आहे .

अगोदरच या गावात पाण्याची फार मोठी समस्या आहे, अजूनही टँकरने या गावाला फक्त पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. परंतु, वापरण्यासाठी पाणी मिळत नाही. ते विहीर, बोर आणि इतर माध्यमातून घ्यावे लागते .

गावातील या डेंग्यू , मलेरिया , चिकून गूनिया यासारख्या आजारांना थांबवण्यासाठी तत्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी अतुल बहुले यांनी आज पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.