India Corona Update: देशातील 30.37 लाख रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई, रिकव्हरी रेट 77 टक्क्यांवर

देशात मागील 24 तासांत 1,096 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 68 हजार 442 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 83 हजार 341 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 39.36 लाख इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 30.37 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 77 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने आता 39 लाखांचा टप्पा पार केला असून, एकूण रूग्णांची संख्या 39 लाख 36 हजार 748 एवढी झाली आहे. यापैकी 8 लाख 31 हजार 124 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 30 लाख 37 हजार 152 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात मागील 24 तासांत 1,096 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 68 हजार 442 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात केल्या जाणा-या कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले असून मागील दोन दिवसांपासून देशात 11 लाख हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. मागील 24 तासांत देशभरात तब्बल 11 लाख 69 हजार 765 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 66 लाख 79 हजार 145 नमुने तपासण्यात आले आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 66 हजार 659 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून. देशाचा रिकव्हरी रेट 77 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 49 मृत्यू आहेत इतर प्रमुख कोरोनाबाधित देशांच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे.

धक्कादायक बाब म्हणजे देशातील 62 टक्के रुग्णसंख्या केवळ पाच राज्यात (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश) आहे. यापैकी 25 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.