Indian Army: सशस्त्र सेना दलात दाखल होऊन मातृभूमीचे रक्षक बनायचं आहे?

सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी या विषयावर येत्या मंगळवारी कार्यक्रम

एमपीसी न्यूज – आपला भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त एमपीसी न्यूजच्या वतीने ‘रक्षक मातृभूमीचे’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात सशस्त्र सेना दलातील (Indian Army) करियरच्या संधी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या मंगळवारी (10 मे) दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच राष्ट्रीय सैनिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, वेटरन्स इंडिया, इंडियन एक्स सर्व्हिसमन लिग, प्रांत पोलीस संघ, सालासार हनुमान प्रचार समिती, खान्देश मराठा मित्र मंडळ आदी संस्था या कार्यक्रमाच्या सहसंयोजक आहेत. ऑर्बिटल उद्योगसमूह व ॲग्रोफिल्ड हे कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत.

भारतीय लष्करातील नामवंत निवृत्त अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन हे उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधतील. ते लष्कराच्या विविध विभागांची तसेच लष्करी संस्थांची माहिती देणार आहेत. लष्करी सेवेत (Indian Army) जवान ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणारी प्रवेश प्रक्रिया, निवड प्रक्रियेसाठी ठरविण्यात आलेले निकष याबाबत मार्गदर्शन करतील. निवृत्त मेजर जनरल जयाप्रसाद नायर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

विद्यार्थी व पालकांना आवाहन

आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी असंख्य वीरांनी योगदान दिले आहे. भारतमातेचे स्वातंत्र्य चिरंतन राहण्यासाठी अशाच शूर, धाडसी, लढवय्या तरुण-तरुणींची देशाला गरज आहे. सशस्त्र सेना दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरूण-तरुणींना त्याबाबत योग्य मार्गदर्शन व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एमपीसी न्यूजने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती एमपीसी न्यूज माध्यमसमूहाचे मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी दिली.

सहभागी होण्यासाठी नावनोंदणी कशी कराल?

सशस्त्र सेना दलात (Indian Army) दाखल होऊन मातृभूमीची सेवा करू इच्छिणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/uZi1zg6UJk6tJXzN8 या लिंकवर क्लिक करावे तसेच आवश्यक ती माहिती भरून फॉर्म सबमिट करावा. कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी 9960562828 या मोबाईल फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Ragistration Form QR Code
Ragistration Form QR Code

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.