Indian Army : भारतीय लष्करातील ‘चित्ता’ हेलिकॉप्टर तिसऱ्यांदा कोसळले; दोन जवान बेपत्ता

एमपीसी न्यूज : चीनच्या सीमेला लागून असलेल्या ईशान्येकडील (Indian Army) अरुणाचल प्रदेशमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मांडला हिल परिसरात घडली. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचाव पथक घटनास्थळी रवाना केले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.

बोमदियाल येथून सकाळी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्याचे लष्कराने सांगितले. सकाळी 9.15 वाजता हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क तुटला. अपघाताबाबत पश्चिम केमांग जिल्ह्याचे एसपी बी भरत रेड्डी यांनी सांगितले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्हाला तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. लष्करासोबतच स्थानिक पोलीस आणि एसएसबीचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.

मुंबईत नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला –

यापूर्वी 8 मार्च रोजी नौदलाचे प्रगत हेलिकॉप्टर ध्रुव मुंबईत अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ कोसळले होते. नियमित उड्डाण सुरू असताना, हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाला, त्यानंतर त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. भारतीय नौदलाने तातडीने बचाव मोहीम सुरू करून हेलिकॉप्टरमधील तिन्ही सदस्यांना वाचवले.

Chinchwad News : गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात तडजोडींची गरजच नाही – प्रियदर्शनी इंदलकर

‘चित्ता’ अपघाताचा बळी ठरत आहे – 

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ सातत्याने (Indian Army) अपघाताला बळी पडत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये दोन वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. याआधी मार्च 2022 मध्येही जम्मू-काश्मीरमध्ये ‘चीता’ हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते, ज्यामध्ये एक पायलट जागीच मरण पावला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.