Pune : भारताचं नंदनवन अवतरलय पुण्यात; ‘वितस्था’ महोत्सवात काश्मिरी संस्कृतीचे दर्शन

एमपीसी न्यूज  : काश्मिरी कलाकुसरीचा पश्मिना,  कशिदाकारीची मुलायम शालकडक चहाची आठवण देणारे कावा पेयअक्रोडच्या लाकडापासून तयार केलेल्या नक्षीदार वस्तू अशा कितीतरी प्रकारच्या दालनांनी कोथरूड एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचा परिसर सज्ज झाला आहे.(Pune)आझादी का अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मिर) सांस्कृतिक महोत्सव पुढील दोन दिवस (दि. 2 एप्रिल पर्यंत ) सुरू राहणार आहे.

एमआयटी परिसरातील झाडांना केशरी, पिवळया पानांची सजावट काश्मिरच्या चिनार वृक्षाची आठवण जागविणारी आहे. नदी नसली तरी काश्मीरची ओळख  देणारा शिकारा, केशराची रंगीबेरंगी फुलं वातावरण अधिकच खुलवत आहेत.

काश्मीरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख दर्शविणारे बाकरखानी, चोक वांगुन, कमळाच्या देठांची भजी, राजमा, कुलचा यासह कित्येक पदार्थांची मेजवानी आहे. (Pune) सुकामेव्यामध्ये अक्रोड, बेदाणे, किवी, चेरी, क्रेनबेरी, दालचिनी, काश्मिरी राजमा, केशर आदींचा समावेश आहे. केशराच्या शेतातील अस्सल मध, लालजर्द केशर तर आहेच.

काश्मिरी हातमाग, ज्यावर पश्मिना, शाली, दुपट्टे, स्टोल्स विणले जातात, त्याचेही प्रात्यक्षिक या तीन दिवसांत दाखविण्यात येणार आहे. ड्रेस मटेरिअल, कापडी टी कोझी, पर्स, पिशव्यांच्या खरेदीला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

PCMC :  महापालिका तिजोरीत 1 हजार 863 कोटींचा महसूल जमा

हा महोत्सव पुढील दोन दिवस पुणेकरांसाठी खुला रहाणार आहे. आज महोत्सवात (एमआयटी वर्ल्डपिस युनिव्हर्सिटी, कोथरूड) ‘आकार’ पुणेतर्फे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ सांगीतिक कार्यक्रम काश्मिरी लोकसंगीत, लोकनृत्यशारदा कलाक्षेत्र फाउंडेशनतर्फे शारदा स्तोत्रम्. (Pune) काश्मिरमधील बालकांचा वाद्यवृंदतर्फे सौरव झाडू आणि प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांचे काश्मिरी आणि डोगरी भाषेतील गायनाचा कार्यक्रम पार पडला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 1 आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी आणि वितस्था यांच्यामधील संबंध, सुरुवातीच्या काश्मीची निर्मिती, काश्मिरी शब्दांचा उगम, काश्मिरी लोकनृत्य, संगीत, नाट्य यांचा शोध घेणारे परिसंवाद आयोजित करण्यात आले असून यात साहित्य अकादमीचे 20 वक्ते बोलणार आहेत.

या महोत्सवाअंर्गत काश्मीरची संस्कृती दर्शविणारे स्टॉल्सखाद्य पदार्थ आणि कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.