Sports News : चिंचवडमध्ये शनिवार, रविवारी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – चिंचवड पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड याअंतर्गत पोदार ‘ थंडर 10’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शनिवार (दि.20) रविवार (दि.2 ) दरम्यान होणार आहेत.यात पुणे शहर परीसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल इंग्रजी माध्यमाच्या 14 शाळांचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती पोदार स्कूल चिंचवडच्या प्राचार्या शहनाज कोटार यांनी दिली.

पुण्यातील पोदार शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळण्याची गोडी निर्माण व्हावी याउद्देशाने ‘पोदार थंडर 10’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे, असे पोदार पुणे हबचे महाव्यवस्थापक फ्रैंकलिन सर यांनी सांगितले.पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवडच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा होणार आहे.

विजयी संघाला चषक, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले जाईल. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शहनाज कोटार म्हणाल्या, स्पर्धेत रोज सकाळी 8 ते दुपारी 5 यावेळेत सामने होतील.स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.अंतिम सामना रविवारी दुपारी होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.