Sign language day : दिव्यांगाना प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे गरजेचे – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज : मानवी संवेदना समजण्यासाठी भाषा हा फार महत्त्वाचा भाग आहे. संवादाच्या माध्यमातून एकमेकांची मने जोडली जातात. (Sign language day) दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे महत्वपूर्ण आहे. सांकेतिक भाषा समाजामध्ये प्रभावीपणे रुजणे गरजेचे आहे., असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जाणा-या टेरासीन रेस्टॉरंट मध्ये जागतिक सांकेतिक भाषादिन साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मुलांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले व सांकेतिक भाषेतील मुलभूत प्रात्याक्षिके दाखविली. दिव्यांगांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी तसेच सहानुभूतीद्वारे नव्हे तर सन्मानाचे व्यासपीठ म्हणून सुरु झालेल्या या रेस्टॉरच्या कार्यक्रमावेळी गायकवाड बोलत होते. यावेळी बालभारतीचे संपादक किरण केंद्रे, प्रसिद्ध उद्योजक कल्याण तावरे, डॉ. सोनम कापसे, वंदना गायकवाड, शैलेश केदारे उपस्थित होते.

शेखर गायकवाड म्हणाले की,  नवीन पिढी समाजात चांगले बदल आणत आहे, समाज देखील तो बदल स्विकारत आहे. त्यामधील एक उदाहरण म्हणजे टेरासीन हा प्रकल्प आहे. (Sign language day) मागील अनेक वर्षे विशेष मुलांना संभाळणे आणि जगवणे हाच उद्देश ठेवून वाटचाल झाली आहे. असा प्रयोग विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून स्वाभिमान देणारा आहे.

Chandrakant Patil : विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे – उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

डॉ. सोनम कापसे म्हणाल्या की, दिव्यांगांना स्वाभिमानाने जगासमोर उभे राहण्यासाठी सुरु झालेले हे रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे. या हॉटेलमध्ये स्वागतापासून ते किचन सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी मूकबधिर असणाऱ्या तरुण-तरुणींवर आहे. सामाजिक बांधीलकी जपत मूकबधिर व्यक्तींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी हे हॉटेल सुरू केले आहे. काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना येथील कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात.

या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये खाद्यपदर्थ्यांच्या पुढे काही सांकेतिक भाषेची चित्रे दिली आहेत. ती पाहून ग्राहक कर्मचाऱ्याला ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर हे कर्मचारी ऑर्डर लिहून घेतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर तयार करतात. अगदी सुटसुटीतपणे ही ऑर्डर कुणीही देऊ शकेल अशा पद्धतीने हा मेन्यूकार्ड तयार करण्यात आला आहे. (Sign language day) जागतिक पदार्थ बनवण्यासाठी नाचणी, ज्वारी, कोडो, राजगिरा यांसारखे स्थानिक पातळीवर पिकणा-या धान्याचे पदार्थ याठिकाणी मिळत असल्याने शेतक-यांचीदेखील उन्नती साधले जात असल्याचे समाधान डॉ. सोनम यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.